आझाद ग्रुपच्या वतीने भव्य दिव्य सत्कार
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा : – लोहा शहरात नुसतीच नावालाच नामांकित नसुन गुणवत्तेला नंबर एक वर असणारी संचालक प्रा दिपक रायफळे सर यांच्या इंदिरा इंटरनॅशनल स्कुलचे पोलिसवाडी परीसरात औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ( ITI ) समोर स्थलांतर झाले असुन या ठिकाणी अतिशय प्रशिस्त निसर्गरम्य , सुसज्ज , मनाला प्रसन्न वाटणारी इंदिरा इंटरनॅशनल स्कूलची सुरूवात झाली आहे . या उच्चशिक्षित शिक्षकवृंद तसेच गुणवत्ता पुर्ण शिक्षण असल्याने शहरासह ग्रामीण भागातील जनतेच्या पाल्यांच्या कौल प्रचंड प्रमाणात वाढला आहे .
इंदिरा इंटरनॅशनल स्कूलचे नवीन ठिकाणी स्थलांतर व गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी या शाळेत घडतात या शाळेचे संचालक प्रा दिपक रायफळे सर सह प्रिसींपल कामजळगे सर सह शिक्षक स्टाॅपचा सत्कार महाराष्ट्र सतत सामाजिक शैक्षणिक कार्यात नावलौकिक असलेल्या आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांच्यावतीने विद्यार्थीप्रिय सहशिक्षक विनोद पा गवते , रणमर्द शिवशंभो युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश पा बाबार , आझाद ग्रुपचे लोहा तालुकाध्यक्ष रूद्रा पा भोस्कर , युवा नेते प्रसादभाऊ पोले वाहन चालक संघटनेचे तालुकाध्यक्ष नागेश पा लोंढे , सह आदिंच्या हस्ते करण्यात आला . व यावेळी शाळेच्या उतुंग भरारीसाठी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या..