गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
गल्ली ते दिल्ली सत्ता असणाऱ्या भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचा यशस्वी कारकिर्दिचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याकरीता भाजपाच्या वतीने महाजन संपर्क अभियान राबवले जात आहे. काल (दि.२१) जुन रोजी लोहा येथील जिजामाता मंगल कार्यालयात आयोजित ९ वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याण भारतीय जनता पार्टी महाजनसंपर्क अभियान व्यापारी,डॉक्टर,वकील,अभियंता, प्राध्यापक संमेलन आयोजित केले होते. सदरील पूर्वनियोजित कार्यक्रमाचे बॅनर मध्ये नांदेडच्या खासदारांच्या एकाधिकारशाही, घराणेशाही ला महत्त्व देत काही पदाधिकाऱ्यांच्या फोटो टाकल्या. लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी गेली साडेचार वर्षांपूर्वी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपात मोठ्या जोमाने प्रवेश केला व भारतीय जनता पक्षाचे काम सुरू केले मन की बात, भाजपा स्थापना दिन, विविध जयंत्या, पुण्यतिथी यांसह पक्षाचे विविध कार्यक्रमांचे आयोजन लोहा शहरात करून पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी व देवेंद्र फडवणीस यांनी जनहितार्थ घेतलेल्या निर्णयांचा विविध योजनाना उजाळा देण्यासाठी व जनतेपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना ची माहिती आपल्या स्तरावर जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी केले पक्षाच्या दृष्टीने विविध कार्यक्रम राबवले. तरीही अचानकपणे भाजपा लोहा कंधार च्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे बॅनर वरून भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांना डावलण्यात आल्यामुळे लोहा शहरासह लोहा कंधार मतदारसंघात एकहाती व घराणेशाही चालवणाऱ्या व लोहा कंधार मतदार संघ हा नांदेड लोकसभा मतदारसंघात येत नसूनही लोहा मतदारसंघात लुडबुड करणाऱ्या खासदार चिखलीकरांच्या घराणेशाही संदर्भात मात्र चर्चेला उधाण आलेले आहे.
गेली साडेचार वर्षात खासदार चिखलीकरांनी लोहा शहराचे प्रथम नागरिक भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांचा शहरातील होत असलेल्या विविध विकास कामासंदर्भात, तसेच गेली कित्येक वर्षापासून लोहा शहरातील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या श्रेयवादावरून रेंगाळलेल्या शहराच्या वैभवात भर पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सर्व श्रेय नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांना आपल्या भाषणातून देणाऱ्या भाजपाचे खासदार चिखलीकर यांनी लोहा शहरात होऊ घातलेल्या महाजन संपर्क अभियानाच्या बॅनर वरून नगर अध्यक्ष यांना डावलण्याचे व घराणेशाहिलाच प्राधान्य देत स्वतःचा मुलगा, मुलगी यांनाच अग्रक्रम दिला,असे कोणते दिवा स्वप्न पडले? आपला बाबा अन् लोकांचं कारट! अशी लोहा शहरात गेली तीन दिवसापासून चर्चेला उधाण आले आहे.
सदरील कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेड लोकसभा,सौ.प्रणिता देवरे-चिखलीकर,प्रवीण पाटील चिखलीकर यांचे अग्रकमाने नाव घेताना भाजपाचे नगराध्यक्ष तथा शहराचे प्रथम नागरिक गजानन सूर्यवंशी यांना डावलून नेमके काय पदरात पाडून घ्यायचे आहे ? पक्षाच्या नियोजित सर्व कार्यक्रमातील घराणे शाही चा पुळका व्यक्त करणाऱ्यांवर पक्षश्रेष्ठी यावर का बोलत नाही? अशी ही लोहा शहरात जोरदार चर्चा होता दिसत आहे.
बऱ्याच वर्षापासून रेंगाळलेल्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा लोहा शहरातील नागरीकांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न,लिंबोटी धरणातून लोहा शहरास शासन दरबारी ६६ कोटी ३९ लक्ष रुपये नळयोजनेला मंजुर करून लोहा शहरातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवल्या बद्दल लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांचे लोहा शहरातील जनतेच्या वतीने जोरदार स्वागत होत आहे. तर दुसरीकडे भाजपा खासदारांकडून मात्र पक्षाच्या महाजनसंपर्क अभियानातून नगराध्यक्षांना डावलून व त्यांची नाचक्की करून नेमकं यांना घराणेशाही व्यतिरिक्त कुणाकडून शाबासकी मिळवायचे आहे. अशा उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. याकडे पक्षश्रेष्ठी लक्ष देतील का? सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळेल का? असेही बोलल्या जात आहे.