दैनिक चालु वार्ता
रायगड (म्हसळा ) प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – जिजामाता मराठी माध्यमिक शाळा वरवठणे- आगरवाडा या शाळेत वृक्षरोपण मा. संजय पांढरकामे आर. एफ.म्हसळा, श्री तुषार लुंगी सा.बा. वि.इंजिनियर साहेब यांच्या हस्ते व संस्थापक श्री महादेव पाटील, संचालक दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत पारपडले या प्रसंगी शाखा अभियंता श्री शेटे साहेब,मा. महाजन साहेब, मा.नाईकनवरे भाऊसाहेब, मा देवरे वनरक्षक , श्री भीमराव सूर्यतळ वनरक्षक उपस्थित होते. झाडे लावा झाडे जगावा, निसर्ग समतोल राखायचे असेल तर भरपूर झाडे लावणे गरजेचे आहे. एक प्रभोदन गीत आपल्या पहाडी आवाजात गाऊन मंत्रमुग्ध शाहीर भीमराव सूर्यथळ यांनी गाऊन विद्यार्थ्यांना भारावून टाकले. या संस्थेचे संस्थापक मा महादेव पाटील साहेब यांनी आपल्या मनोगतात शाळेविषयी सविस्तर इतिवृत्त सांगितले. प्रमुख पाहुणे मा. संजय पांढरकामे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळेचे मुख्याद्यापक संदीप कांबळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले विद्यार्थी मा रोहन माळी इंजिनियर पाणी पुरवठा म्हसळा, ओमकार मोहिते, अजित तिळटकर, जितेंद्र मेंदाडकर, हुर्तीक मकाजें, वाय. पी बाकेर, प्रणय मेंदाडकर या सर्व इंजिनियर मंडळींनी शाळेत शिकणाऱ्या इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांना 13 सेट पुस्तके देऊन मोलाचे कार्य केले त्या बद्दल शाळेच्या वतीने संस्थापक महादेव पाटील साहेब यांनी हि त्यांचे धन्यवाद व्यक्त केले. व अश्याच प्रकारे शाळेला पुढे हि मदत करत राहावे अशी आशा व्यक्त केली.
तर प्रास्थाविक शाळेचे शिक्षक अंगद कांबळे यांनी केले
सूत्रसंचलन संदीप सुतार यांनी केले तर आभार शाळेचे संचालक दिलीप कांबळे यांनी व्यक्त केले. या शाळेचे शिक्षक दिपक म्हात्रे, नितीन म्हस्के, अंकुश गाणेकर, लक्ष्मण गाणेकर, विद्यार्थी उपस्थित होते…