दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर): आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीर काॅग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हा कार्यकारणीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार विविध पदावर कार्यकर्त्याची नियूक्ती करण्यात आली यावेळी
देगलूर तालूक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा काॅग्रेस पक्षाचे सक्रीय एकनिष्ठ कार्यकर्ते रुपेश पाटील भोकसखेडकर यांची नांदेड येथे माजी मंञी तथा माजी खासदार भास्करावराव पाटील खतगावकर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार अमर भाऊ राजुरकर,माजी मंत्री डी पी सावंत,आमदार माधवराव पाटील जवळगावकर,माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,माजी उपमहापौर सुरजितसिंग यांच्या हस्ते पक्ष पद वाटपाच्या कार्यक्रमात नांदेड जिल्हा काॅग्रेस सोशल मिडीया सचिव पदी रुपेश पाटील भोकसखेडकर यांची निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले.
माजी मुख्यमंञी अशोकरावजी चव्हाण यांच्यासह पक्षातील पदाधिकारी वरीष्ठ नेते यांच्या मार्गदर्शानात ग्रामीण भागात काॅग्रेस पक्ष संघटन आणखी मजबूत करण्यासाठी पक्षाचे विचार सर्वसामान्यापर्यत पोहचवण्यासाठी सोशल मिडीच्या माध्यमातून मी अविरत प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रीया रुपेश पाटील भोकसखेडकर यांनी दिले.दरम्याण सदरील निवडीचे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.मंगाराणी ताई आंबुलगेकर,काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शंकरराव कंतेवार,माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार,दिपक शहाणे,अनिल बोन्लावार,सौ.नंदा ताई देशमुख,सौ.मधुमती घोंगडे ताई,मुख्तार पटेल हनेगावकर यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुपेश पाटलांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिले.