दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड देगलूर(प्रतिनिधी)- आज दिनांक 14 सप्टेंबर 23 रोजी परमपूजनीय गोळवलकर गुरुजी प्राथमिक वि उच्चद्यालयात पोळा,मातृदिन व हिंदी दिवस कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर, विद्यासभा संयोजक सचिन जाधव व वक्त्या म्हणून अश्विनी कदम मंचावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली. यानंतर मान्यवरांचे स्वागत झाले.आई विषयावर आधारित वैयक्तिक गीत अनिता देवगिरे यांनी सादर केले.
यानंतर कार्यक्रमाच्या वक्त्या कदम बाईंनी मुलांना पिठोरी अमावस्या ,पोळा सणाविषयी माहिती दिली . हा सण का साजरा केला जातो त्या मागचे महत्व मुलांना सांगितले. त्याचबरोबर मातृदिन याविषयी सांगत असताना आईचे आपल्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे हे मुलांना छोट्या छोट्या गोष्टीतून उदाहरणे देऊन पटवून सांगितले. तसेच हिंदी दिवसाचे महत्त्व सांगत असताना राष्ट्रभाषा हिंदीचा मान राखत आपण भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
यानंतर विद्यासभा संयोजकांनी मुलांना शेतात कष्ट करणाऱ्या बैलपोळा सणाविषयी माहिती मुलांना दिली .अध्यक्ष समारोपात देगावकर सरांनी मुलांना हिंदी दिवसाचे महत्व सांगितले. हिंदी भाषेतून संवाद साधला पाहिजे. हिंदी आपली राजभाषा आहे. यानंतर कार्यक्रम हिंदी गीताच्या नृत्य सादरीकरणाने संपन्न झाले. सई झरीकर व सानवी नरवाडे या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा तोटावर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.