दै.चालु वार्ता
पेठवडज प्रतिनिधी गजानन जाधव
नांदेड (कंधार) :- कंधार तालुक्यातील पेठवडज येथील आमरण उपोषणाला स्थगिती दिली असून मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व उपोषणकर्त्यांना आपले आमरण उपोषण मागे घेण्यास सांगितले होते त्यामुळे पेठवडज येथील उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेऊन साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. यावेळी गजानन जाधव, व्यंकटी जाधव, पांडुरंग कंधारे तसेच मराठा समाज बांधव उपस्थित होते.