अमरावती (अंजनगाव सुर्जी) : आज बैलपोळ्याचा सण आहे. वर्षभर शेतकऱ्यांसोबत शेतात राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.आजच्या दिवशी मोठ्या उत्साहानं शेतकरी आपल्या सर्जा राजाची पूजा करुन त्याला पुरणपोळी भरवतात.या दिवशी कोणताच शेतकरी बैलाला खांद्यावर ओझे देत नाही.
अंजनगाव सुर्जी शहरातील सुर्जी परिसरातील द्वारका चौक येथील प्राचीन व प्रसिद्ध असलेल्या द्वारकेच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली.या यात्रेचे विशेष आकर्षण असलेल्या येथील ठीक-ठिकाणच्या द्वारकेच्या नंदी बैलाला बघ्यांची गर्दी झाली होती.सुर्जी परिसरातील द्वारका चौक येथे भव्य प्रमाणात पोळा भरत असतो.
आज दि.१५ सप्टेंबर रोजी सर्व मानाचे दहा ते बारा नंदीबैल मारोती मंदिर द्वारका चौक देशपांडे वाडा येथून वाजत-गाजत निघतात.यादरम्यान भव्य प्रमाणात द्वारकेच्या यात्रेचे आयोजन करण्यात येत असते.
– श्रीकांत नाथे