दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी
आज रोजी वाडा तालुका विधी सेवा समिती, तालुका वकील संघ व ग्रामीण रुग्णालय वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण भारतभर जनजागृती व संपर्क अभियानाअंतर्गत जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आज ग्रामीण रुग्णालय वाडा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमां मध्ये डॉक्टर किणी मानसोपचार तज्ञ यांनी मानसिक आरोग्य व मानसिक आजाराबाबतचे समज-गैरसमज या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले, त्यानंतर डॉक्टर नगराळे यांनी मानसिक आरोग्य अधिनियम 2017 याबाबत विस्तृतपणे प्रकाश झोत टाकला. या कार्यक्रमांमध्ये पॅनल विधी तज्ञ श्री संतोष डेंगाने व कु. सदिच्छा पातकर यांनी देखील मानसिक आरोग्य व सकारात्मक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन केले .
श्री मनोहर सैदाने अध्यक्ष वाडा तालुका विधी सेवा समिती यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण मनोरुग्ण आणि मानसिक अपंग व्यक्तींकरिता योजना 2015 व विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यपद्धती या विषयावर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे नियोजन डॉक्टर श्री भडांगे अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वाडा व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री भानुशाली यांनी केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुग्णमित्र तथा रक्तकर्ण प्राध्यापक श्री किरण थोरात यांनी केले सदर कार्यक्रमास जिल्हा मानसिक आरोग्य अभियानातर्फे डॉक्टर किणी, डॉक्टर नगराळे मानसोपचारतज्ञ ,तालुका वकील संघाचे पदाधिकारी ,ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक ,वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस अधिकारी, रुग्णमित्र संघटना , न्यायालयीन कर्मचारी इत्यादी हजर होते. सदर कार्यक्रमास पन्नास लोकांची उपस्थिती होती शासनाचे करोणाचे नियम पाळूनच सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.