दै चालू वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ऑनलाइन नोकर भरती प्रक्रियेसाठी आयसीआयसीआय बँकेकडून पद भरतीसाठी ऑनलाइन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे . कोरोनाच्या संकट काळामध्ये अनेक लोकांचे नोकऱ्या गेले आहेत . महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय सदैव तत्पर आहे . बँकेच्या ऑनलाईन पद भरती प्रक्रियेत सहभागी होऊन संधीचे सोने करावे असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद अडकिने यांनी केले .
कोरोना काळामध्ये हवालदिल झालेल्या समाजातील अनेक पदवीधरांना महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय , मुखेड व आय सी आय सी आय बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे . मागील अनेक दिवसापासून वीरभद्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष इंजि. श्रीकांत पाटील हंगरगेकर , सचिव रणजीत पाटील हंगरगेकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिने यांच्या प्रयत्नाने बेरोजगार असणाऱ्या व हाताला काम नसणाऱ्या उच्चशिक्षित युवकांसाठी रोजगाराचे खुले व्यासपीठ ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले आहेत . डी.एड. , बी.एड. , स्पर्धा परीक्षेच्या विविध पदांची भरती बंद असताना खाजगी क्षेत्रातील नामवंत बँकेकडून सिनियर आँफिसर , पब्लिक रिलेशन आँफिसर या सारख्या पदावर काम करण्याची
रोजगारांची संधी उपलब्ध करून देऊन हवालदिल झालेल्या लोकांना आर्थिक लाभ घेण्याचे साधन करून देत आहेत .
या भरतीसाठी विद्यार्थ्यांकडे 2017 -2021 या दरम्यान शिक्षण घेतलेली कोणत्याही शाखेची पदवी म्हणजेच बी.ए., बी.काँम्., बी.एस्सी. या सारख्या शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. 10 वी ,12 वी , पदवी गुणपत्रिका , आधार कार्ड , पँन कार्ड ही कागदपत्रे महत्वाचे आहेत . प्रसारमाध्यमांच्या विविध भागाद्वारे लिंक पाठवून दि.12 आँक्टों. रोजी सकाळी 11.00 वाजता ऑनलाइन पद्धतीची प्रक्रिया उपलब्ध करून दिलेले आहेत . अधिक माहितीसाठी प्रा.डॉ. एस.एच.टाले 7798917401, प्रा.डॉ. सी.एम.कहाळेकर 9860327738 , प्रा.डॉ. जे.जी.कहाळेकर 9730401807 , प्रा.डॉ. सी.एन.एकलारे 9665582036 , प्रा.डॉ. शेंबाळे 9890297362 यांच्याशी संपर्क साधून या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी सोईचे होईल . सदरील महाविद्यालय कोरोनाच्या काळात समाजातील लोकांना केवळ शिक्षणच उपलब्ध न करून देता . समाजाचा शैक्षणिक , सामाजिक , आर्थिक , सांस्कृतिक स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे . संस्था व महाविद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर वर्गांनी देखील मागील अनेक दिवसांपासून कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्नशील आहेत . ही संधी पालक , विद्यार्थ्यांनी न सोडता लाभ घेतल्यास अनेकांचे जिवनमान उंचावेल . बहुसंख्येने जास्तीत जास्त गरजवंतानी आँनलाईन नोंदणी करून सहभागी व्हावे . घरी रहा व सुरक्षित काम करा ही शासनाची संकल्पना घेऊन आयसीआयसीआय बँक व महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, मुखेड यांनी संधी उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर आहेत असा मनोदय प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिने यांनी व्यक्त केले.