दै.चालू वार्ता,
विष्णुपुरी सर्कल नांदेड
बालाजी पाटील गायकवाड
जानापुरी
*सेवानिवृत्त मेजर भारत मातेचे सुपुत्र संजय रावसाहेब पा. ढगे यांचा मौजे जानापुरी येथील शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष कैलास पाटील कदम यांच्या तर्फे छोटेखानी सत्कार करण्यात आला.*
जनापुरी येथे शहीद संभाजी कदम यांच्या पुतळ्याला ढगे पिंपळगाव येथील रहीवासी तथा भारत मातेचे सुपुत्र मेजर संजय रावसाहेब पाटील ढगे हे भारत मातेची 26 वर्ष सेवा करून आपल्या गावाकडे जात असताना जानापुरी येथील शहीद संभाजी कदम यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली व जानापुरी गावच्या वतीने छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण समितीचे (अध्यक्ष)कैलास पाटील कदम,लक्ष्मण पाटील कदम,बालाजी पाटील कदम ,ञ्यंबक पाटील कदम व गावकरी मंडळी उपस्थित होते.