दैनिक चालू वार्ता
रायगड प्रतिनिधी प्रा.अगंद कांबळे
आपतकालीन परिस्थितीवर
मातकारण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. आपातकालीन परिस्थिति
हाताळण्यासाठी आपातकालीन मार्गदर्शन शिबिरचे आयोजन करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कुल व् कनिष्ठविद्यालय म्हसळाचे प्रा. महंमद शेख यांनी केले खपोली येथे पुणे येथील, ” यशदा “संस्थेच्या वतीने आपतकालीन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात विवेक नायडू, विष्णु मसळे, महाजन सर, ढ़ोणे सर,
यांनी प्रशिक्षणार्थिना मार्गदर्शन केले तीन दिवस चाललेल्या प्रशिक्षण शिबिरास शिक्षक,मुख्याध्यापक, प्रशासकीय अधिकारी, उपस्थित होते कार्यकर्माचे सूत्रसंचलन श्री शिंदे सर यांनी केले. या प्रसंगी देशमुख सर, दांडेकर सर, जाधव सर, राठोड सर, गावित सर,
यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थीचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले