दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनीधी
बालाजी देशमुख
बीड नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळीचा सण असल्याने वाढीव महागाई भत्ता आणि पाच महिन्याच्या फरकासह ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबरचे नियमित वेतन २५ ऑक्टोबरपर्यंत शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी. एस. घाडगे, सरचिटणीस व्ही. जी. पवार आणि जिल्हा सचिव राजकुमार कदम यांनी मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर
जानेवारी २०१० पासून गोठवलेला महागाई भत्ता आणि जुलै ते नोव्हेंबर २०१९ या पाच महिन्यांचा पाच टक्के महागाई भत्त्याचा फरक ऑक्टोबरच्या वेतनासमवेत अदा करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करावी.
दरमहा नियमित वेतन अदा होण्यास विलंब होत असल्याचा अनुभव आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर असा अनुभव महाराष्ट्रातील शिक्षकांना येऊ नये म्हणून ११ टक्के महागाई भत्ता आणि फरकासह ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबरचे नियमित वेतन दिवाळीपूर्वी २५ ऑक्टोबरपर्यंत • शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी मागणी घाडगे व कदम यांच्यासह सरचिटणीस व्ही. जी. पवार, जिल्हाध्यक्ष डी. जी.. तांदळे, जिल्हा सचिच राजकुमार कदम, केंद्र कार्यकारिणी सदस्य अशोक मस्कले, जिल्हा सहसचिव नागनाथ तोंडारे, चंद्रशेखर साखरे, कालिदास धपाटे, गणेश आजबे, युवराज मुरूमकर, विनोद सवासे, नामदेव काळे, बंडू आघाव, काळबा कसवे, आदींनी केली आहे.