दैनिक चालू वार्ता
अंबरनाथ तालुका प्रतिनिधी भुषण गजरे
बदलापूरवासियांनो , गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मोहिम पोलिसांनी सुरू केली आहे. #परिमंडळ_४ चे पोलिस उपायुक्त श्री. प्रशांत मोहिते यांनी तसे सुस्पष्ट आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिलेत….
त्यातील महत्वाचा भाग म्हणजे पोलिसांनी निर्जन, दुर्लक्षित, अंधाऱ्या जागांची यादी करायला घेतलीय व असुरक्षित ठरू शकतील, अशा ठिकाणी गस्त वाढवलीय.
विशेषतः गांजासेवन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. सोबत रोडरोमियो, नाक्यांवर उभे राहून वेळकाढूपणा करणारी मुलं, पानटपरीवर दिसून येणारी शाळकरी मुलं तसंच भाईगिरी करून आपल्या भागात दहशत पसरवू पाहणारे गुंड पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. या मोहिमेत जनतेचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. आपापल्या भागातील निर्जन, दुर्लक्षित, अंधाऱ्या जागा, टवाळखोरांचे अड्डे, गांजा सेवन, सार्वजनिक ठिकाणी दारूपार्टी करणारे टपोरी, स्त्रियांची छेडछाड करणारे रोडरोमियो, दमदाटी, खंडणीखोरी, दहशत पसरवण्यासाठी कारवाया याची माहिती जनतेने पोलिसांपर्यंत पोहचवणं गरजेचं आहे.
अशी माहिती आपण पोलिस ठाण्यांना कळवू शकता, कंट्रोलला काॅल करून सांगू शकता.
#७७४४८४४८७९ या वाॅटस्एप क्रमांकावरही पाठवू शकता…..