दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी-रामेश्वर केरे
लवकरच मान्यवरांच्या शुभहस्ते होणार पुरस्कार वितरण – संस्थेचे सचिव प्रा. सहदेव मोरे पाटील यांची माहिती
कोरोना सारख्या जागतिक महामारी त सरपंच म्हणून मागील दीड वर्षातील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आपल्या कामाचा आदर्श इतरांनी घ्यावा अशा स्वरूपाचे काम रणाऱ्या व पुराणकाळात जीवाचे रान करून गावाच्या भवितव्याचा विचार करत प्रसंगी गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करणार्या परंतु न डगमगता आलेल्या संकटाला निधड्या छातीने सामोरे जाऊन सरपंच पदावर असताना कोरोना काळात व गाव परिसरातील प्रत्येक प्रश्नांवर अत्यंत प्रशंसनीय व प्रेरणादायी असे काम केल्याबद्दल शिवसृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणार मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार धामोरी खुर्द उपसरपंच रवींद्र चव्हाण यांना जाहीर करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रा सहदेव मोरे पाटील यांनी दिली.
गावातील मंडळी शहरात जातात किंवा शहरातील मंडळी गावी येतात अशा अनेक लोकांच्या संपर्कातील विविध व्यवसाय करत असतात त्या सर्वांची आवश्यकतेनुसार रॅपिड एंटीजन टेस्ट करणे, गावातील पंचेचाळीस वर्षावरील व्यक्तींना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेणे, गावात घरोघरी जाऊन कोरोनाची चैन ब्रेक करण्याचा प्रयत्न करणे, आपलं गाव पुर्ण कोरोना मुक्त करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसेच कोरोणासह गाव तसेच परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी नेहमीच रविंद्र चव्हाण यांची धडपड वाखण्याजोगी आहे.
वीज, रस्ता , पीककर्ज, जळालेली रोहित्र, भूमिअभिलेख कार्यालय व ईतर प्रश्नांसाठी आपण केलेल्या आंदोलने यशस्वी झाली. सरपंच आपल्या दारी उपक्रम राबवून नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे,ग्रामपंचायत कर वसूली असो किंवा गाव – परिसरातील कोणताही प्रश्नांसाठी आवाज उचलून तो प्रश्न तडीस नेण्यासाठी आपण सर्वसामान्यांचा आवाज बनला असल्याने धामोरी खुर्द उपसरपंच रवींद्र चव्हाण यांना पुरस्कार दिला जात असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
कोरोना काळात घरात बसून राहावे अशी परिस्थिती असताना आपण गावाच्या पालकांच्या भूमिकेतून प्रयत्नशील होतात आजही गावातील लसीकरण त्यासाठी आवश्यक असणारे कॅम्प त्यासंबंधाने असणारे नियोजन या सर्व जबाबदाऱ्या अत्यंत जबाबदारी पूर्वक आपण पार पाडत आहात असेही संस्थेच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे
लवकरच मान्यवरांच्या शुभहस्ते आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त महानुभावांचा विशेष कार्यक्रमांतर्गत सन्मान करण्यात येणार असून त्याबाबतची दिनांक वेळ व स्थळ लवकरच कळविण्यात येईल अशी माहिती संस्थेचे सचिव प्रा सहदेव मोरे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.