दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज :- राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण कोविड -१९ मुळे ज्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली आहे , अशा संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांनी दिले आहेत
यात नियोजन आराखड्यातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत स्पष्ट केले आहे. त्याअनुषंगाने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील संस्थांची अर्हता दिनांकाप्रमाणे प्रारूप मतदार यादी तयार करून प्राधिकरणाचे आदेशानुसार निवडणूक निधीसह संबंधित जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी व तालुका सहकारी निवडणूक अधिकारी कार्यालयास तात्काळ सादर करणे आवश्यक आहे.