दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई- आपल्या राजकीय उमेदीची गेली चाळीस वर्षे काँग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी पणाला लावलेल्या बीड जिल्हा युवक काँग्रेस, फादर काँग्रेसच्या अध्यक्षासह राज्य पातळीवर सहसचीवाच्या पदावर १५ वर्षांपेक्षा अधिक काळ काम पहाणा-या आणि अंबाजोगाई नगर परीषदेवर गेली २५ वर्ष काँग्रेस पक्षाचा झेंडा तेवत ठेवणा-या राजकिशोर मोदी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुहूर्त आता निश्चित झाला असून २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०: १० मिनीटांनी ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात अधिकृत प्रवेश करून राष्ट्रवादीची डाळ आपल्या मनगटावर बांधणार आहेत.
तत्कालीन खा. सौ. केशरकाकु क्षीरसागर यांच्या नेतृत्वानंतर गेली चाळीस वर्षे बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावत ठेवण्यासाठी प्राणपणाने काम करणाऱ्या राजकिशोर मोदी यांची गेली अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात घुसमट होत होत होती. राज्य पातळीवर • काम करतांना राजकिशोर मोदी यांना जरी स्वॉफ्ट कॉर्नर मिळत असला तरी जिल्हाच्या राजकारणात त्यांना खा. रजनीताई पाटील या सतत अडवणुक करतात अशी त्यांची धारणा झाली होती. बीड जिल्ह्यात विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक आ. नमिता मुंदडा यांचा आरोप राजकिशोर मोदी आणि खा. रजनीताई पाटील यांच्या गटात गेली अनेक वर्षे सारखी धुसफुस सुरु होती.