दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
ह.भ.प रामेश्वर म. नालेगावकर यांच्या कीर्तनाने झाली सांगता
मंठा प्रतिनिधी :-
मंठा :-दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्यदिव्य वारकरी बाल संस्कार शिबिर हेलस ता. मंठा या ठिकाणी मोठ्या थाटामाटात शिबिराचे आयोजन केले होते. या बाल संस्कार शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक महिन्याच्या कालावधीत चांगले संस्कार घडावे त्यांना वारकरी संप्रदायाची माहिती आपला धर्म आपली संस्कृती संतांची चरित्रे,हरिपाठ, भगवद्गीता, हनुमान चालीसा, मृदंग बोल,पावल्या असे विषय एक महिना विद्यार्थ्यांना शिकवले जाते. अशा या भव्य दिव्य शिबिराचे मार्गदर्शक ह भ प रामेश्वर महाराज नालेगावकर माऊली वारकरी शिक्षण संस्था मंठा संचलित यांच्या आशीर्वादाने पार पडले शेवट आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा व किर्तन सोहळा थाटात पार पडला या शिबिराचे आयोजन ह.भ.प. आप्पा महाराज भुसारे व ह भ प संदीप महाराज मार्कड यांच्या नियोजनात पार पडले. तर या शिबिरातील शिक्षक वृंद म्हणून माऊली महाराज टाळीकुटे धानोरा, केदार महाराज ताठे, महेश म.नालेगावकर, अंकुश महाराज खराबे या सप्ताहाच्या शेवटी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली या शिबिरात मोठ्या थाटामाटात गावकऱ्यांच्या वतीने अन्नदान झाले व काल्याच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली महापंगतीचे अन्नदाते सतीश निर्वळ ( बंडू नाना ) व सतीश निरवळ नान्सी कर यांच्या महा पंगती ने शिबिराची सांगता झाली.