दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
मुखेड:- श्री राजेश गायकवाड यांचे कागदपत्रे बनावट असल्याचे खालील कारणावरून सिद्ध होते-१)अर्थिक दुर्बल घटकांचा प्रमाणपत्रावर दोन वेळा राजमुद्रा असलेल्या स्टॅपचा प्रयोग करुन प्रमाणित केले ते कायदयाला अनसरुन नाही.राजमुद्राचा गैरवापर केला आहे. २) शासन आदेशातील निकशानुसार राजेशच्या वडिलांचे कॉलेज सोडल्याचे प्रमाणपत्रावर दि. २/७/१९८४ रोजी शाळेत प्रवेश केला आहे आणि शाळेत प्रवेश करण्यापूर्वीच दि. ७/४/१९८४ रोजी कॉलेज सोडल्याचे दिसते यावरुन जनता हायस्कूल (ज्यूनियर कॉलेज) नायगाव येथील बनावट कॉलेज सोडल्याचे प्रमाणपत्र आधारे आ.दु.घ प्रमाणपत्र मिळविले.
३) राजेश हणमंत गायकवाड यांच्या आ.दु.घ. प्रमाणपत्रांच्या मुळ स्थळ प्रतीवर तहसीलदार यांची स्वाक्षरी नाही काहीतरी कोंबडा पद्धतीचे स्वाक्षरी आहे.४) शासन आदेशानुसार उत्पन्नाचे पुरावा, सातबारा, ८अ / फार्म१६, पुरावा जोडला नाही.(५) शासन आदेशानुसार अर्जदार किंवा त्याचे कुंटुबातील सदस्य दि. १३ ऑक्टोबर १९६७ किंवा त्या अधिचे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्या बाबतचा पुरावा जोडले नाही.
६) १९६७ च्या आगोदरचा जातीचा पुरावा वडिलाचे /आजोबाचे काकाचे निर्गम किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, त्यांच्या आ.दु.घ पात्रता प्रमाणपत्र प्रस्तावाच्या अर्जासोबत जोडले नाही.
वरील सर्व माहिती, माहिती अधिकार कायदयातून मिळविली आहे. सदरील पुराव्याच्या अनुषंगाने श्री. राजेश हणमंत गायकवाड यांचे आर्थिक दुर्बल घटक पात्रता प्रमाणपत्र निव्वळ बनावट / चुकीचे असल्याचे दिसत आहे. त्या आधारे त्यांनी अर्थिक दुर्बल घटक १०% आरक्षणातुन आपल्या
उपविभागिय अधिकारी कार्यालया अंतर्गत तलाठी पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती आदेश मिळवुन शासनाची फसवणुक केली आहे. कृपया राजेश गायकवाड त्यांचे चौकशी करुन आ.दु.घ. पात्रता प्रमाणपत्र रद्द करावे या मागणीसाठी श्री. एस.एस.खैरवाड यांनी मा. तहसीलदार साहेब तहसिल कार्यालय मुखेड यांना निवेदन दिले आहे.