दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
चंद्रपूर-
ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळ चंद्रपुर च्या वतीने गृहिणी/महिला कला-कौशल्य,व विविध प्रश्नासंदर्भात
मा.ना.यशोमती ठाकुर, मंञी
महिला व बालकल्याण म.रा. यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली या भेटी दरम्यान उपस्थित ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळाचे संचालक मा.अशोक अंबागडे व सहसंचालक सौरभ मादासवार यांनी सदर विषयान्वये माहीतीपुस्तीका सादर केली.
चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्यातील आदीवासी बहुल भागातील सक्षमिकरण,गृह उद्योग विषयी बहुतांश समस्या मंञी महोद्यापुढे मांडल्या तसेच *”गृहिणींना घरबसल्या रोजगार”* या नावीण्यपुर्ण उपक्रमाविषयी सविस्तर माहीती दिली.ग्रामीण भागातील गृहिणींनी घरबसल्या तयार केलेल्या गृहपयोगी वस्तुंची माहीती देऊन समोर आयोजीत करन्यात येणाऱ्या स्पर्धा व प्रदर्शनीसाठी निमंञीत केले. आणी मंञी मान्यवरांनी निमंञण स्विकारले. गृहिणींना आधार देण्याचे सत्कार्य ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळातर्फे होत आहे अतिशय छान कार्य असे प्रतिपादन केले.