दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी- आपसिंग पाडवी
सिताफळ आणि गावरान आंब्यानंतर सातपुड्याच्या कुशीत पिकणारं ओलमे हे फळ सातपुड्यातील रस्त्यांवर विक्रीसाठी दिसत आहे.विशेषतः ओलमे हे फळ लहान मुलं विकत असल्यामुळे त्यांची कमाई होत आहे.
सातपुड्याच्या कुशीत तोरणमाळ,जापी खडकी,बामणा, ओहवा, पिंपळखुंटा, डाब, मोलगी, जमाना आदी परिसरात ओलमे या फळांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.विशेष म्हणजे हे झाडे नैसर्गिकरित्या उगवलेले झाडे आहेत त्यामुळे या झाडांची देखभाल करण्याची गरज नाही.ओलमे कच्चे असतांना त्यांचा रंग हिरवा असतो तर पिकल्यानंतर ओलम्यांचा रंग हा तपकीरी होतो.हे फळ नैसर्गिकरित्या पिकत असते त्यामुळे ओलमे पिकविण्यासाठी कोणत्याही प्रकारची रसायन अथवा पावडर वापरण्याची गरज नसते.
ओलमे नैसर्गिकरित्या पिकत असल्याने त्याची चव गोड आंबट आणि तजेलदार असते त्यामुळे या ओलमे खाण्याची मजा काही औरच असते.साधारण पणे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्या पासुन हे ओलमे निघण्यास सुरुवात होते व ते जुनच्या अखेर पर्यंत उपलब्ध असते.
विशेष म्हणजे या ओलमे ठेवण्यासाठी खास पळसाच्या पानाचा वापर केला जातो.त्यामुळे ओलम्याची चव आणि त्याचा रंग आकर्षक होतो.
धामणे – सातपुड्याच्या डोंगरात रानात आढळणारे बहुगुणी रान मेवा. हे फळ जितके मुलांना आवडतात तितकेच पक्ष्यांनादेखील आवडतात.हे फळ पिकू लागले की पक्षी शोधून हे फळ खात असतात.उन्हाळ्यात सातपुड्यातील रस्त्यांवर लहान आदिवासी मुलं धमाणाच्या वाटा पाडून विकून आपल्या आई वडिलांना घरातील खर्च उचलून हातभार लावताना दिसत आहे.