दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार : जिल्ह्यातील आकांक्षित जिल्हा प्रकल्प योजनेअंतर्गत ज्ञान वर्षा (डिजिटल व्हर्चुअल क्लासरूम) प्रकल्पाला जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी भेट दिली.
यावेळी त्यांनी प्रकल्पाची पाहणी व कार्यपध्दती जाणून घेतली. या प्रकल्पातर्गत जिल्ह्यातील 310 जिल्हा परिषद शाळांना उच्च दर्जाचे साहित्य पुरविण्यात आले असून या सर्व शाळांमध्ये ज्ञान वर्षा डिजिटल क्लासरूम उभारण्यात आले आहेत. तसेच नंदुरबार येथे नगरपालिका शाळा क्र 1 येथे उच्च दर्जाचा व्हर्च्युअल स्टुडिओ उभारण्यात आला आहे.
या स्टुडिओमधून एकाचवेळेस 310 शाळांना ऑनलाईन पध्दतीने जोडून एखाद्या विषयावर तज्ञ शिक्षक एकाचवेळी सर्व शाळांना संबोधित करतील, अशी माहिती महाआय.टी प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापक जयेश खैरनार यांनी दिली आहे.