दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
कराड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका सराईत घरफोडी करणाऱ्या चोरट्यांची कराडच्या स्थानिक गुन्हे पथकांने मुसक्या आवळल्या. सदरची कारवाई कराड तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण पथकांने केली. सदर आरोपीकडुंन जवळपास सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यांत आला. संकेत ऊर्फ नरेंद्र संदीप कदम ( वय 25 रा.गोवारे रोड विद्यानगर कराड) असे या आरोपीचे नाव आहे याबाबत पोलिस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन याबाबत डॉ. तुषार दोशी यांच्या फिर्यादीवरुन कराड शहरांतील शिवाजी हाऊसिंग सोसायटीत डॉ. तुषार दोशी राहण्यांस आहेत विंग येथे त्यांचा कृष्णा व्हॅली नावाचा बंगला असून या बंगल्यातून दिनांक १3 जून रोजी चोरट्यांने ९८ हजार रुपये एलईडी टीव्ही लंपास केला होता याबाबत डॉ. दोषी यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यांत फिर्याद दाखल केली होती त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांला गुन्ह्यांचा तपास कामी सूचना केल्या असता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासांची सूत्रे हलवली असता सदर आरोपीच्या हालचालीवरुन पोलिसांनी त्याला ताब्यांत घेऊन कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्यांची कबुली पोलिसांना दिली. आरोपीकडून चोरी केलेला ९८ हजार रुपयांचा एलईडी टीव्ही पोलिसांनी जप्त केला तसेच त्यांने कृष्णा व्हीलीच्या केफ कटेनर मधून २० हजार रुपयांचा फ्रीज ही पोलिसांनी जप्त केला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा दुधभाते यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सज्जन जगताप ,सचिन निकम पोलीस हवा. उत्तम कोळी आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला त्यांच्या या कामगिरीबद्दल परिसरांतून कौतुक होत आहे