जितेंद्र कुलसंगे अनुसूचित जमाती जिल्हा उपाध्यक्ष नांदेड यांची मागणी.
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी अजय चव्हाण
किनवट तालुक्यातील बहुतांश भाग हा आदिवासी बहुल असून येथील गावेही पेसा अंतर्गत येतात, सन 1185 रोजीच्या मा. राज्यपाल साहेब यांच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षेत्रात आदिवासी उमेदवारांना व लाभार्थ्यांना संधी मिळावी यासाठी पेसा कायदा लागू करण्यात आला, किनवट येथील शा. आश्रम शाळेत भरण्यात आलेल्या पदासाठी कुठलेही जाहीर प्रगटन, कुठल्याही दैनिका मध्ये जाहिरात दिली नाही, यामुळे आदिवासी उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहता आले नाही, त्या करिता सबंधित आश्रमशाळेत आदिवासी उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी अनुसूचित जमाती जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र कुलसंगे यांनी केली आहे.
किनवट तालुक्यातील आदिवासी उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत, जे उमेदवार या पदासाठी सर्व अहर्ता धारण करत असतील, अशा पात्रता धारक व रोजंदारी कर्मचाऱ्याला तासिका तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घ्या असे आदेश एकात्मिक बाल विकास अधिकारी किनवट यांना अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग, अमरावती यांनी दिलेले आहेत.
शासन पत्र संदर्भ क्रमांक आस्था/2016/प्र. क्र.387/का-15/ 12 ऑक्टोंबर 2021 त्या त्या करिता सदरील भरती तत्काळ रद्द करण्यात यावी, चालू सत्रात सन 2021-2022 करिता दैनिक वृत्तपत्र मध्ये जाहिरात देवून सर्व प्रथम आदिवासी उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, व पात्र आदिवासी उमेदवारांनाच नियुक्त करण्यात यावे,अन्यथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र च्या वतीने उग्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कुलसंगे यांनी दिला, माझ्या तक्रारीची दखल घेऊन अर्ज दिनांकापासून आपण केलेल्या कार्यवाही चा लेखा-जोखा मला कळविण्यात यावा, व संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात यावा अशी मागणी जितेंद्र कुलसंगे यांनी केली आहे.
या विषयी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास विभाग, किनवट यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर अनुसूचित जमाती जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र कुलसंगे, गोविंद अंकुरवार,सूर्यदेव खिलारे,संदीप कानके, श्री. नवशाद खान,अशोक नैताम, राधाबाई सलाम,शोभा कुलसंगे, मनीषा गेडाम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.