दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना 1 ऑगस्ट रोजी महसूल दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आले आहे. इंदापूर तालुका पत्रकार संरक्षण समिती तालुका अध्यक्ष बाळासाहेब सुतार व लोकमत प्रतिनिधी सुधाकर बोराटे, टणु गावचे माजी सरपंच सोमनाथ मोहिते यांच्या हस्ते तहसील कचेरी इंदापूर येथे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा हार व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी इंदापूर तालुका पत्रकार संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सुतार, लोकमत प्रतिनिधी सुधाकर बोराटे, टणु गावचे माजी सरपंच सोमनाथ मोहिते, या वेळी उपस्थित होते . इंदापूर तालुक्यामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी गोरगरिबांना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढून सहकार्य करणारा उत्कृष्ट अधिकारी म्हणून ओळख संपूर्ण तालुक्यामध्ये निर्माण झाली अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला पुढील कार्यामध्ये पत्रकारांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या सत्कारा प्रसंगी बाळासाहेब सुतार म्हणाले की, ‘ इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून झालेला सन्मान हा इंदापूर तालुक्यासाठी मोठा बहुमान आहे.’