दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा- संभाजी गोसावी
पुणे परिमंडळ आरोग्य सेवा प्रभारी असलेले डॉ. संजोग कदम यांना आरोग्य नियमीत पदोन्नती नव्या सरकारकडूंन सोपविण्यांत आली. त्यांच्या अखत्यारीत सातारा ,पुणे सोलापूर हे तीन जिल्हे असून त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे विविध क्षेत्रांतून कौतुक होत आहे. डॉ. संजोग कदम हे मूळचे सातारा जिल्ह्यांतील असून माजी नगराध्यक्षा माधवी कदम यांचे ते पती आहेत. त्यांनी १९८८ पासून वर्ग २ अस्थिरोग विभागांत वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले होते. पदोन्नतीने १९९९ रोजी अस्थिरोगतज्ञ वर्ग १ या पदावर जिल्हा रुग्णालयात त्यांची पदोन्नती झाली तब्बल २३ वर्षापासून ते आर्थोपेडिक सर्जन म्हणून वर्ग १ या पदावर कार्यरत होते. सातारा जिल्हा रुग्णालयांत जिल्हा शल्य चिकित्सक म्हणूनही त्यांनी तीन महिने काम केले होते. आरोग्य सेवेच्या ३४ वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवांमुळे त्यांची दीड वर्षांपूर्वी प्रभारी पुणे आरोग्य उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली होती. या कालावधीमध्ये डॉ. कदम यांनी उल्लेखनीय कार्य केले. जिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली आशवासक प्रगती योजना अनेक वर्ष प्रलंबित होती ती मार्गी लावली. याचा सोलापूर,पुणे सातारा जिल्ह्यांला कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला. डॉ. संजोग कदम यांची कामगिरी पाहून नव्या सरकारांने डॉ. कदम यांना आरोग्य उपसंचालक पदी त्यांची नियमीत पदोन्नती करण्यांत आली.