दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक- ओंकार लव्हेकर
कंधार शहरातील मुख्य रस्ता म्हणजे महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक हा रस्ता अतिशय बिकट बनला आहे.
सदरील रस्ताच्या दोन्ही बाजूने उघड्यावर भाजीपाले वाले, हॉटेल वाले ,पानपट्टी वाले, कटिंग दुकान, फुल वाले, चप्पल वाले ,कपडे दुकान, केळाची दुकान ,फळांचे दुकाने, अशी विविध प्रकारची दुकाने उघड्यावर थाटली असून दोन्ही बाजूने वाहन चालविणे अतिशय कठीण होऊन बसले आहे.
सदरील रोडवर मोठ मोठाले खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पाऊस पडल्यानंतर नागरिकांची सायकल चालविणे अथवा मोटरसायकल चालविणे कसरत होऊन बसली आहे.
त्यातल्या त्यात भर म्हणजे डुकरांचा वावर या भर रस्त्यावर फिरत असतो तर काही प्रमाणात जनावरांचाही वावर दिसतो पण याकडे संबंधित प्रशासन डोळे झाकून बसत आहे ही मात्र आश्चर्याची गोष्ट आहे.
रस्ता होणार होणार म्हणून सतत चॉकलेट देत नागरिकांची मते मिळवली पण अजून तर हा रस्ता झालाच नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संबंधित प्रशासना विरोधात प्रचंड नाराजी आहे.
सदरील मुख्य रस्त्यावर राजकीय खेळीमुळे जनसामान्यांचा मात्र जीव टांगणीला लागला आहे. इतर शहरांमध्ये रस्ते ही चांगल्या प्रकारची आहेत. पण मुख्य रस्ता महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक व दोन्ही बाजूने दुकाने जर चांगली झाली तर कंधार पुन्हा एकदा नव्याने श्वास घ्यायला तयार होईल.
सोमवारी खूप प्रमाणात गर्दी तयार होते बाजार असल्यामुळे वाहन सोडाच पण साधे पायी चालणे सुद्धा कठीण होऊन बसत आहे त्यामुळे छोटी मोठी तुरळक शाब्दिक चकमक होत असतात.
तरी संबंधातील कार्यालयाने याकडे लक्ष घालून लवकरच हा रस्ता दर्जेदार बनवावा अशी मागणी होत आहे.