दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी .
उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांची प्रकल्प संचालक बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामविकास प्रकल्प पुणे या ठिकाणी नेमणूक करण्यांत आली. तर त्यांच्या रिक्त जागी वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची नियुक्ती करण्यांत आली. डॉ. सचिन ओबासे हे २०१५ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. पुणे येथील बीजे मेडिकल येथे एमबीबीएसचे शिक्षण झालेले आहे. राज्य शासनांने त्यांची उस्मानाबाद जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती करण्यांत आली. जिल्ह्यांतील विकास कामे करण्यासोबतच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्यांचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे शुक्रवारी रुजू झाले. आई तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद कायम पाठीशी असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नूतन जिल्हाधिकारी यांची उस्मानाबाद जिल्हाधिकारी म्हणून पहिलीच पोस्टिंग आहे. यावेळी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत अधिकाऱ्यांमार्फत करण्यांत आले जिल्हा जि.ष.चे मुख्य कार्यकारी राहुल गुप्ता,अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, रोहयोचे उपजिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे आदीं अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यांत आले.