दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्नः
नांदेड : ज्येष्ठ नागरिकांना समाजात योग्य सन्मान प्राप्त व्हावा, त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना आरोग्य सुविधांसह इतर सर्व सुविधा अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक असून ज्येष्ठांसाठी मला जे-जे करता येईल त्यासाठी आपला लोकप्रतिनिधी म्हणून मी सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही आज 1 ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिली.
डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन सभागृहात सामाजिक न्याय विभाग व ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात श्री. वसंतराव बारडकर, स्वातंत्र्य सैनिक श्री. विष्णुपंत पुराणिक व अन्य ज्येष्ठांचा विशेष सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय सुविधा आणि इतर सुविधा वेळीच उपलब्ध व्हाव्यात यासाठी भारत सरकार अधिक दक्ष आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत या योजनांमधून गरजू, पात्र लाभार्थ्यांना वैद्यकीय सुविधा, मोफत उपचार अंगिकृत रुग्णालयांमध्ये दिले जातात. ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुविधा देण्याचा माझा मानस असल्याचेही या वेळी सांगितले.
या समारंभास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव डी. एम. जज, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप, फेसकॉमचे अध्यक्ष अशोक तेरकर, ॲड. सिद्दिकी, गायत्री परिवाराचे ज्येष्ठ नागरिक वसंतराव बारडकर, दत्तात्रय काळे, संध्या छाया वृद्धाश्रमाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर तसेच जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.