दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि : -जुबेर शेख
पुणे शहरा मध्ये संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या युवक संघटकपदी मा. श्री.संतोष पवार यांची नियुक्ती करण्यात आली तसे पदनियुक्तीपत्र खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते संतोष पवार यांना देण्यात आले.
यावेळी संतोष पवार यांनी सांगितले,खडकवासला मतदारसंघा मध्ये जास्तीत जास्त नविन युवकांना संघटन करुन जास्तीत जास्त मतदान राष्ट्रवादी कसे होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याच बरोबर
येणाऱ्या काळामधे खडकवासला मतदारसंघ मध्ये विधान सभेला व लोकसभेला मताधिक्य देण्यात तसेच राष्ट्रवादी विजय मिळवण्यासाठी, राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा सामान्य लोकांपर्यन्त पोहचण्याचे काम करणार आहे व येणाऱ्या विधानसभा व लोकसभा मधे पक्षाला जास्तीत जास्त मतदान घडून आणन्यासाठी खड़कवासला विधानसभा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली योग्य ते परिश्रम करणार आहोत.पक्षा ने केलेल्या कामाची दखल घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष किशोर दादा कांबळे व खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे युवक राष्ट्रवादी अध्यक्ष मा.श्री श्रीहारी .शरद दादा दबडे मा.श्री . खडकवासला विधान सभाचे युवक राष्ट्रवादीचे कार्य अध्यक्ष मा.श्री . कुणाल पोकळे,श्री . बाळासाहेब चव्हाण व श्री .राम शिंदे,मा.श्री .ऊमेश दादा पवार श्री .फुलचंद भोसले,श्री .देविदास पडदे साहेब,मा.श्री .आभिजित पवार,.श्री .आमोल दळवी.श्री .तात्यासाहेब बहिर,श्री मंगेश शेठ सांळुखे,साहेब,सरचिटणीस – राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे मा.श्री .पदमन मुळीक,मा.श्री .गणेश सोनवणे,मा.श्री .अक्षय कांबळे हे देखील उपस्थित होते.