दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड – श्री शिवाजी हायस्कूल माणिक नगर नांदेड व ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नवीन कौठा नांदेड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताची माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जयंती दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला अनुक्रमे नवीन कौठा व माणिक नगर नांदेड येथे शालेय समिती सदस्य सूर्यकांत कावळे , शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुधीर भाऊ कुरुडे तसेच उप मुख्याध्यापक डी.पी. कदम पर्यवेक्षक सदानंद नळगे , या दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या जयंती सोहळ्यात महात्मा फुले प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरी सेमी वर्गात शिकत असलेली स्वजल जयवंत यानभुरे व पहिली सेमी वर्गात शिकत असलेल्या स्वराज जयवंत यानभुरे या लहान चिमुकल्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन चरित्रावर भाषणे केली त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुधीर भाऊ कुरुडे यांनी स्वजल यानभुरे व स्वराज यानभुरे या लहान चिमुकल्या बाळाना अनुक्रमे 101 रु.बक्षीस देऊन प्रोत्साहन देऊन आशीर्वाद दिला तशीच प्रा नवघरे रत्नमाला मॅडम यांचा लहान मुलगा रिधान जयराज लाडेकर या तीन वर्षाच्या चिमुकल्यानी अतिशय बोबड्या आवाजात राष्ट्रगीत म्हटल्यामुळे त्यांचे सर्वांच्या वतीने कौतुक करण्यात आले व चॉकलेट रुपी गिफ्ट देण्यात आली.
याप्रसंगी ज्युनिअर कॉलेजचे ज्येष्ठ प्रा. वसंत राठोड तसेच प्रा. रूपाली कळसकर प्रा.वैशाली दुलेवाड , प्रा.जामकर दिपाली , प्रा नवघरे रत्नमाला , प्रा.तेजस्विनी कोंडेकर , प्रा.कपील सोनकांबळे , माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक एस.एम. पारेकर , सुशील कुरडे , व्यंकट उपास , विजय पवार , सचिन कळसे , योगेश भांगे , शैलेश भांगे , दिगंबर कांबळे , राहुल पसलवाड , सचिन गायकवाड यादव सर , निलेश देशमुख सौ.पद्मा वरवंटकर , सुजाता कांबळे , सुवर्णा कळसे , दिनकर एम. एम. व शिक्षकेतर कर्मचारी सचिन फुके , संतोष भांगे इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयवंत सोपानराव यानभुरे यांनी केले.