दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- कवि सरकार इंगळी
काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने,
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि कवयित्री हेमांगीताई बोंडे यांच्या एकसष्ठी निमित्त पिंपरीत येथील महिंद्रा रॉयल मल्टीपर्पज हॉल, महिंद्रा रॉयल सोसायटी, एच ए ग्राउंड समोर,नेहरू नगर रोड ,पिंपरी पुणे येथे २ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत राज्यस्तरीय काव्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मसाप पुणेच्या शाखा पिंपरी -चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करून सदर काव्यमहोत्सवाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्याध्यक्ष आनंद घोडके तर प्रमुख अतिथी म्हणून काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्यसचिव कालिदास चवडेकर, पुणे विभागीय अध्यक्ष नवनाथ खरात, उपाध्यक्ष लक्ष्मण काटेकर हे उपस्थित होते.
उद्घाटनानंतर हेमांगी बोंडे यांची एकसष्ठी समारंभ संपन्न झाला. सकाळी ११:०० ते १२:३० या वेळी दुसऱ्या सत्रामध्ये बबन धुमाळ (जेष्ठ गझलकार तथा पुणे जिल्हाध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित काव्यप्रेमींचा गझलमुशायरा तर तिसऱ्या सत्रामध्ये दुपारी १:०० ते ३:०० या वेळेत काव्यप्रेमी राज्य समिती सदस्य संदीप वाघोले यांच्या अध्यक्षतेखाली काव्यप्रेमी आजीवन सभासदांचे कविसंमेलन संपन्न झाले. अर्चना मुरूगकर, कविता काळे व योगिता पाखले यांनी सत्रनिहाय सूत्रसंचालन तर अशोक बोंडे यांनी आभार प्रदर्शन केले. सदर काव्यमहोत्सव यशस्वी होण्यासाठी रणजित पवार, प्रसन्न धुमाळ व काव्यप्रेमी शिक्षक मंच पुणेच्या सदस्यांनी कष्ट घेतले.