दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई: अभिनेता प्रभास आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून सुरू असलेला वाद तीस हजारी कोर्टात पोहोचला आहे. अधिवक्ता राज गौरव यांनी कोर्टात याबाबत याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत त्यांनी आदिपुरुष चित्रपटातील आणि टीझरमधील आक्षेपार्ह भाग काढून टाकण्याबाबत युट्यूबसह इंटरनेट मीडियासला निर्देश देण्याटी मागणी केली आहे. भगवान राम आणि हनुमान यांचे पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला आहे.
याचिकाकर्त्याने चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणावर सोमवारी न्यायाधीश अभिषेक कुमार यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. वकील राज गौरव यांनी सांगितले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रतिवादी रामायण सारख्या महाकाव्याच्या मूळ स्वरुपात बदल होऊ शकत नाही. हा भारताच्या संस्कृतीचा, सभ्यतेचा आणि अध्यात्म आणि धर्माचा भाग असल्याचे ते म्हणाले.
प्रतिसादकर्त्याला संपूर्ण भारताच्या सुवर्ण इतिहासाशी खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. भगवान रामाची प्रतिमा शांत प्रिय आहे, परंतु चित्रपटाच्या टीझरमध्ये रामाची प्रतिमा एक अत्याचारी, सूडबुद्धी वागणारा तसेच रागीट व्यक्ती म्हणून चित्रित करण्यात आली आहे.
दुसरीकडे, बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) प्रमुख आणि राज्यसभा सदस्य शिबू सोरेन यांच्याविरुद्ध लोकायुक्तांच्या कारवाईला स्थगिती देण्याच्या आदेशात तात्काळ सुधारणा करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला.
दरम्यान भाजप खासदार निशी कांत दुबे यांनी चित्रपटावरील बंदी हटवण्याची मागणी याचिका केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सोरेन यांना नोटीस बजावली आणि दोन आठवड्यांत उत्तर मागितले. या प्रकरणावर सोरेन यांचे उत्तर आल्यानंतरच स्थगिती उठवण्याच्या मागणीवर निर्णय घेतला जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे.