दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
पिसाळलेल्या दोन मोकाट कुत्र्यांनी मुखेड शहरातील मोंढा, शिवाजी नगर,अशोकनगर भागासह, मुख्य रस्त्यावरील परिसरात धुमाकुळ घालुन तब्बल १३ जणांना चावा घेतला असुन या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे यामुळे कुत्र्यांचा अनेकांनी धसका घेतला असुन नगरपरिषदेने या मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करुन बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.
शहरामध्ये मोकाट कुत्र्याने काही तासातच अचानक १३ जणांना चावा घेतल्यामुळे नागरिक घाबरले असुन कुत्रा चावा घेण्याच्या भितीने रस्त्यावरील नागरिक सैरावैरा पळू लागले. त्या मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः काही नागरिकांच्या फेडंरीचे लचके तोडले आहे कुत्रा चावल्याने जखमी झालेल्या नागरिकांवर शहरातील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे तर त्यापैकी पाच जणांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे जखमीमध्ये वैभव संजय स्वामी चांडोळा ,महादेपा पुतप्पा गंदीगुडे मुखेड , नरसिंग धोंडीबा गिरी, माधव संतुका मुखेडकर, अहमद इस्माईल मनियार, मस्तान खुरेशी, विजय दत्तात्रय फुलेवाड, लक्ष्मीबाई माधव कदम, नागेश संतोष कोतवाले, गजानन उत्तम चव्हाण, इंदुबाई नरोटे, यादव दिगंबर गायकवाड, सयाजी भद्रे मुखेड या १३ नागरिकांना मोकाट कुत्र्याने चावा घेतला आहे जखमी नागरिकांचा डॉ.किशोर कदम, डॉ शैलेष देशमुख ,सिस्टर तुलसी नाईक,ब्रदर विजय कोनापुरे,ब्रदर योगेश पावरा, ब्रदर शंकर तेलंग,मधुकर गुद्दे, लखन पवार, प्रशांत बनसोडे व चौहान आदींनी उपचार केले आहे.