दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यातील शिळवणी गावातील विवाहितेवर बलात्कार करण्याचा आरोप असलेल्या मुख्याध्यापकास मरखेल पोलिसांनी सोमवारी अटक करून मंगळवारी दि. ७ रोजी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्या मुख्याध्यापकास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
देगलूर तालुक्यातील शिळवणी येथील एक २९ वर्षीय विवाहित महिला रविवारी दि. २९ जाने रोजी तुरीचे रास वेचण्यासाठी शेतात सकाळी दहांच्या सुमारास गेली होती. त्या शेतालगत असलेल्या शिळवणी येथील व्यंकटराव देशमुख विद्यालयाचा मुख्याध्यापक गंगाधर पांढरे हा तिथे आला. त्याने त्या महिलेसोबत अश्लील चाळे केले. झटापट केली. या महिलेने विरोध दर्शविला. तेव्हा त्या नराधम मुख्याध्यापकाने तिला ओढत धुऱ्यावरील लिंबाच्या झाडाच्या आडोशाला
कुठे वाच्यता केलीस तुझे अश्लील फोटो व्हायरल करतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद त्या विवाहितेने मरखेल पोलिसात दिली. पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्या मुख्याध्यापकास सोमवारी रात्री अटक केली. त्याला मंगळवारी देगलूर येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने दि.१० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.