दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर नगर परिषद देगलूर संचालित डॉ बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिकेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात येथिल विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कि पहिले विद्यार्थ्यांना आभ्यासासाठी पुणे मुंबई नांदेड अश्या ठिकाणी जावावे लागत असे पण देगलूर नगरपरिषद देगलूरचे तत्कालीन नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार व मुख्याधिकारी ईरलोड साहेब यांनी हि बाब लक्षात घेऊन देगलुरच्या विद्यार्थ्यांची कसरत लक्षात घेऊन देगलूर येथिल विद्यार्थ्यांना सुसज्ज असे वातनाकुलीत डॉ बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिकेची स्थापना केली त्याबद्दल विद्यार्थ्यांन मध्ये खूप आनंद झाला असे विद्यार्थ्यांनी मनोगतात व्यक्त केली या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी नगर परिषदेचे ग्रंथपाल कळसकर सर युवा शिवसेना जिल्हा चिटणीस धनाजी जोशी लोकमत छायाचित्रकार किरण मुधोळकर व सर्व कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते…