दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: काल महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटना संलग्न भारतीय बहुजन कामगार संघाच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री संजयजी केनेकर साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा. ना. श्री सुरेशजी खाडे साहेब यांना आज दि. ०२/०३/२०२३ रोजी महाराष्ट्र विधान भवन येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या त्रिपक्षीय अंशदान निधीत वाढ करणे तसेच शासनाकडे रु. १२० कोटी पेक्षा जास्त थकीत असलेले अंशदान मंडळास तात्काळ प्रदान करणे बाबतचे निवेदन देण्यात आले, यावेळी संघटनेचे महासचिव श्री संदीप कुलकर्णी हे उपस्थित होते