दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/लोहा :- मनकर्णा प्राथमिक शाळा नविन वसाहत लोहा जि.नांदेड या शाळेत अनधिकृतपणे शिक्षण खात्याची परवानगी नसताना इयत्ता सहावी व सातवी चे वर्ग चालवून शिक्षण खाते व पालकांची दिशाभूल आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले असल्यामुळे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्यावर बडतर्फी शिस्तभंगाची कारवाई व संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून जून 1995 ला नाव प्राथमिक शाळेला विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिली असून माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड यांनी पत्र क्र.जि.प.ना./शि.अ.प्रा-५ब/६०३९३/२०१६ रोजी केवळ इयत्ता पाचवी वर्गास विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिलेली असताना सदर शाळेने शिक्षण खात्याची परवानगी नसताना इयत्ता सहावी व सातवी चे वर्ग चालवून अनधिकृतपणे शैक्षणिक वर्षे २०१४ ते २०२२ पर्यंत चालवून विद्यार्थी,पालक व शिक्षण खात्याची दिशाभूल करून फसवणूक केली आहे.परंतु शिक्षण खात्याने दुर्लक्ष केल्याने संबंधित शाळेने ६ व ७ च्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती (बढती) देऊन ईतर शाळेत प्रवेश देण्यासाठी बोगस व बनावट टि.सी.देऊन विद्यार्थ्यांची व पालकांची फसवणूक केलेली आहे. सदरचे विद्यार्थी इतर शाळेत प्रवेश घेऊन शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होऊन पूढील शिक्षण घेत आहेत. ही बाब विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अन्यायकारक असून हितावह नाही.६ ते ८ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी दिलेली आहे.जि.प.कार्यालयीन पत्र दिनांक १९/८/२०१९ रोजी सदर शाळेच्या चौकशीसाठी शिक्षणविस्तार अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले असताना मनकर्णा प्राथमिक शाळेची चौकशी केली असता.शैक्षणिक वर्षे २०२१-२२ मध्ये इयत्ता ६ वी वर्गात २४ विद्यार्थी व इयत्ता ७ वी वर्गात २१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याची बाब निदर्शनास आली आहे.सदरील विद्यार्थ्यांच्या बनावट टि.सी.मुख्याध्यापकांनी इतर शाळेस दिल्याचे मा.शिक्षणविस्तार अधिकारी लोहा यांचे चौकशी अहवालातील काॅलम ८ मध्ये लेखी नमूद केलेले दिसते.मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.सबंधित शाळेतून परीसरातील इतर शाळेत अनधिकृत टि.सी.च्या आधारे प्रवेश दिला आहे.गाडगे महाराज हायस्कूल लोहा ६ विद्यार्थी,विश्वनाथराव नळगे हायस्कूल लोहा २६ विद्यार्थी, प्रतापराव पाटील हायस्कूल सुनेगाव ३ विद्यार्थी ,संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा लोहा ३ विद्यार्थी, माध्यमिक आश्रमशाळा विठ्ठलनगर लोहा ६ विद्यार्थी वरील शाळेत ६ ते ८ वी वर्गात प्रवेश देऊन विद्यार्थ्यांना वर्गोन्नती बढती दिलेली आहे.सबंधित मुख्याध्यापकास त्यांच्या शाळेतील गैरवर्तनामुळे कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.त्याचे उत्तर आतापर्यंत दिलेले नाही ही बाब गंभीर स्वरूपाची आहे.मनकर्णा शाळेतील ६,७ वर्गात अनधिकृत प्रवेश २०१४ ते २०२२ पर्यंतचे सर्व अनधिकृत अभिलेखे , प्रवेश निर्गम पंचिका , गुणदान रजिस्टर, विद्यार्थी हजेरी, शिक्षक उपस्थितीपट ,बनावट टि.सी.दिलेले रजिस्टर आपल्या ताब्यात घेऊन संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा आम्हास वरील संबंधीतावर गुन्हे दाखल करण्याची लेखी परवानगी देण्यात यावी अशी मागणी अॅड विनायकराव कदम पाटील अभिनवनगर कंधार यांनी केली आहे.