दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड श्रीराम नवमी व हिंदु एकता दिवसा निमित्त हिंदु महागर्जना रॅली व धर्मसभा दि. 9 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता बागेतील हनुमान मंदीर बिलोली येथे टायगर राजासिंह भैय्या यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. या हिंदु महागर्जना सभेस लाखोंच्या संख्येने हिंदु बांधव सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदु परिषदचे जिल्हा सहमंत्री संजय वाघमारे यांनी केले आहे.
टायगर राजासिंह भैया हिंदु बांधवांचा आत्मा आहे. यांची सभा होऊ नये काही लोक प्रयत्न करीत आहेत पण भारतात लोेकशाही आहे, कोणीही कुठेही जाऊन सभा घेऊ शकतात. बिलोली येथील हिंदु महागर्जना सभा तर होणारच यात नांदेड जिल्हयातील सर्वच तालुक्यातून हिंदु बांधव या सभेस हजर राहणार आहेत तर जिल्ह्याच्या बाहेरील सुध्दा हिंदु बांधव या सभेस यावे असे आवाहनही वाघमारे यांनी केले आहे.
बिलोली येथील ही सभा सकल हिंदु समाज यांच्या वतीने घेण्यात येणार असुन या सभेची जय्यत तयारी होताना दिसत आहे. टायगर राजासिंह भैया हिंदुचा अवाज म्हणून संपुर्ण भारतात ओळख आहे. कोरोनाच्या काळात मागील दोन वर्षापासुन सभा न झाल्याने टायगर राजासिंह भैय्या यांच्या सभेस मोठा जनसमुदाय येण्याची शक्यता आहे.
मुखेड तालुक्यातुनही हिंदु बांधव जाणार
मुखेड तालुक्यातून टायगर राजासिंह भैय्या यांच्या सभेस हजारो हिंदु बांधव जाणार तर भविष्यात टायगर राजासिंह भैय्या यांची सभा मुखेड येथे घेणार असल्याचे बजरंग दल तालुका संयोजक शंकर नाईनवाड यांनी सांगितले.