दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड : – गोपाळचावडी जि. प. शाळेतील केंद्रिय मुख्याध्यापक अवधूत दिगंबरराव पाटील लांडगे हे ३३ वर्ष प्रदीर्घसेवा बजावून सेवेतून आज ३१ मार्च रोजी शुक्रवारी सेवानिवृत झाले.त्याच्या सेवानवृत्ती बद्दल गोपाळचावडी जि. प. शाळेत त्यांचा गौरव दि.३१मार्च रोजी करण्यात आला.
मुख्याध्यापक अवधूत लांडगे ३३ वर्ष सेवा करून सेवेतून निवृत झाले.त्यांंची पहीली नियुक्ती ६ नोव्हेंबर १९९० मध्ये परोटी तांडा किनवट येथुन सुरूवात झाली आहे . सन २००६ रोजी त्यांना तालुका गुरू गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,सन २००९ साली त्यांना मराठा सेवा संघाच्या वतीने गुरूगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
परोटी तांडा किनवट,कोलंबी नायगाव,टाकळी त ब,गोळेगाव लोहा,कामळज लोहा,गोपाळचावडी नांदेड या ठीकाणी यांनी सेवा बजावली अनेक डॉक्टर्स,तहसिलदार,इंजिनीयर,शिक्षक,पोलीसअधिकारी,तलाठी,राजकीय अशा अनेक क्षेञामध्ये त्यांनी विद्यार्थी घडविले आहेत. अवधूतराव लांडगे यांच्या सेवानवृत्ती व दीर्घायुष्य शुभेच्छा देण्यासाठी माननीय मा. शिक्षण अधिकारी व्यंकटराव पाटील, केंद्रप्रमुख गुजरवाडी ,मुख्याध्यापक सर्जे,मुख्याध्यापक काकांडी मन्यार,गडावर मॅडम, गिरी मॅडम, हेड कॉन्स्टेबल गिरी ,पिएसआय केंद्रे ,सर्व मुख्याध्यापक व सहशिक्षक गोपाळचावडी शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच मराठा सेवा संघाचे आर .पाटील,मराठा आरक्षणाचे मराठवाडा संयोजक तथा मराठवाडा नेताचे शिवाजीराव हंबर्डे,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे,गोपाळचावडीचे सरपंच साहेबराव सेलुकर,मा नगरसेविका करूणाताई जमदाडे,नगरसेवक उदय देशमुख,भाजपा जिल्हाध्यक्ष संजय घोगरे,युवक काॅंग्रेसचे जि.उपाध्यक्ष सतिश बस्वदे,छ शिवाजी महाराज ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष यशवंत आवाळे,मनसे जिल्हाध्यक्ष सुभाष भंडारे उपस्थित होते.