दैनिक चालु वार्ता अहमदपूर प्रतिनीधी –
अहमदपूर : – भारतीय जनता पार्टीचे अहमदपूर व चाकुर मतदारसंघाचे माजी मंत्री मा. विनायकरावजी पाटील यांच्या हस्ते युवा नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य अहमदपूर राम नरवटे यांचा वाढदिवस करण्यात आला अहमदपूर तालुक्यात त्यांचा मोठा मित्र परिवार आणि विविध राजकीय मान्यवरांच्या हस्ते साजरा करण्यात आला.
अहमदपूर येथे भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून सामाजिक कार्यत सतत अग्रेसर असतात त्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग तसेच मित्रपरिवार तालुक्यामध्ये आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक दिन दुबळ्या गरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात .
आज त्यांचा वाढदिवस सरपंच लंच होम या ठिकाणी साजरा करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी होती आणि त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी सरपंच लखन भैय्या घोडके, सरपंच मोहन पोले, चेअरमन गोविंद नरवटे, राजू पाटील मुकनर, परशुराम सुरनर, पत्रकार विष्णू पोले,सहशिक्षक -बालाजीकाळे,आनंद देवकत्ते,आशिष धुळगुंडे, बालाजी सुरनर, जिल्हाध्यक्ष नाना नरवटे पाटील, पत्रकार नंदराज पोले पाटील सुमठाणकर, दीपक नरवटे,युवा नेते महेंद्र ससाने, इत्यादी उपस्थित होते.