दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
तालुक्यातील मस्सा( खं )येथील ग्रामस्थाचे ग्रामदैवत म्हणून ओळख असणाणारे जागृत देवस्थान महादेव यात्रेस सोमवारपासून सुरुवात होत आहे.या यात्रे निमित्त विविध कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 27मार्च पासून अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सुरु आहे.3 एप्रिल रोजी सकाळी सात ते दहा यावेळेत पालखी मिरवणूक व ह भ प किरण ताकमोगे यांचे कल्याचे किर्तन होणार असून नंतर महाप्रसाद ची पंगत होईल. यानंतर संध्याकाळी सोंगाचा कार्यक्रम व शोभेची दारू उडवण्यात येणार आहे.
दिनांक चार एप्रिल रोजी भव्य कुस्त्या चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये जास्तीत जास्त पहेलवानानी सहभागी व्हावे असे अहवान यात्राकमेटी नी केले आहे.याचदिवशी संध्याकाळी पुणे येथील अण्णाभाऊ शिंदे यांच्या कला पथकाचा संस्कृतीक कार्यक्रम होणार आहे.
यासाठी यात्राकमेटीचे अध्यक्ष प्रकाश सावंत, उपाध्यक्ष श्रीकांत वरपे,सचिव संतोष तिकोने, कोषाध्यक्ष श्रीगणेश शेळके, सह तुकाराम लक्षणन थोरात,नेमीनाथ इंगोले, परिश्रम घेत आहेत.
यात्रे निमित्त ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छता करण्यात आली असून संपूर्ण गावा मध्ये लायटिंग,मेनरोड ते महादेव मंदिर डेकोरेशन करण्यात आलेआहे.
प्राचीन काळी बांधलेल्या मंदिराचे बांधकाम हेमांडपंथी असून त्यावर भव्य शिखर व पितळी कलश बसवलेला आहे.मंदिरा शेजारी मोठा आड व कुंड अशी रचना आहे.या पुरातन मंदिरात देव दर्शना साठी प्रत्येक सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते.