
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
शि. म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथील वाणिज्य विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभात उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमच्या अद्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील पवार तर प्रमुख उपस्थितीत वाणिज्य विभागाचा माजी विद्यार्थी व व्याख्येते प्रतिक गायकवाड हे होते. प्रमुख पाहुणे प्रतिक गायकवाड यांनी असे म्हंटले की, विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केल्यावर यशप्राप्त करताना स्मार्ट परिश्रम केले पाहिजे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास संपला तरी शिक्षण क्षेत्रातील प्रवास निरंतर सुरूच राहणार आहे, यासाठी ताण तनावावर मात करून आपले लक्ष्य गाठावे असे प्राचार्य डॉ सुनील पवार यांनी नमूद केले.
तृतीय वर्षातील विद्यार्थी ओंकार तोडकर, प्रेरणा वेदपाठक, योगेश्वरी पाटील, अमृता मिटकरी, गौरी गुजर, गायत्री वाघमारे, रेणुका दीक्षित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या निरोप समारंभ कार्यक्रमात धनराज खापे या विद्यार्थ्यांला गेल्या तीन वर्षात उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी “Student of the Year” पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी वाणिज्य विभागातील डॅा. नागनाथ अदाटे , डॉ. संजय सावंत, डॉ. खोसे सर, प्रा तांबोळी सर यांनी मेहनत घेतली. तर उपप्राचार्य डॅा.भगवान सर, तसेच डॅा.गुंडरे सर, डॅा.सुर्यवंशी सर, डॉ. ढोले सर, डॉ. मस्के सर, डॅा.साकोळे सर, डॉ.पावडे सर,प्रा.दळवी सर, ग्रंथपाल प्रा फाटक सर, प्रा. अंकुशराव सर हे कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी तोष्णीवाल आणि काजल पवार या विद्यार्थ्यांनी केले.