दैनिक चालु वार्ता मोखाडा प्रतिनिधी:सौरभ कामडी
शहापूर तालुक्यातील विहीगाव येथील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून संतप्त ग्रामस्थांनी . झालेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची चौकशी करा, तसेच जो ठेकेदार या रस्त्याचे काम करत आहे, त्याला लवकरात लवकर काळ्या यादीत टाका, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी करीत आहेत.
तसेच हा रस्ता चांगल्या दर्जाचा नाही
पुल कॅकेटीकरण चे काम अतिशय निकृष्ट होत आहे. याबाबत संतप्त ग्रामस्थांनी कामगारांना वेळोवेळी सांगूनही ते चांगल्या प्रकारचे काम करत नाहीत.
बॅरिकेड्स, सुरक्षेसाठी लाल पट्ट्या, कोणत्याही प्रकारचे बोर्ड लावण्यात आलेले नाहीत. काम सुरु रस्ता बंद बोर्ड नाही या ठिकाणी कोणते काम सुरु आहे. त्याचाही माहिती फलक नाही. जे काम सुरु आहे ते अतिशय निकृष्ट पद्धतीचे काम सुरु आहे. या कामाची तपासणी करून यामध्ये जे दोषी असतील त्या ठेकेदारांवर कारवाई करावी व्हावी
असे बोलले जात होते. रस्त्याचे काम सुरु असताना रस्त्यावरील माती बाजूला काढावी लागते. ती पूर्णपणे काढली गेलेली नाही,रस्त्यावरील खड्डे, खडी भरून घ्यायचे असताना मुरामाने खड्डे भरून घेतले आहेत.