दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
परभणी: येथे राज्याचे मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवार दिनांक 05 एप्रिल 2023 जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या मार्फत IBPS च्या 50000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या 30 बार्टी सेंटर्सला बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची चौकशी करून त्यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात यावी.या मागणी सह डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी, मागील 43 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या पिएचडी च्या 861 विद्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिप मंजूर करावी,अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत पीडितांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या वर्षीच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जातीच्या विकासासाठी देण्यात येणाऱ्या निधीत 12 टक्के कपात करण्यात आली आहे ती पूर्ववत वाढवून देण्यात यावी या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी परभणी कार्यालयास देण्यात आले.
यावेळी परभणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद सावंत यांच्यासह शेषराव जल्हारे,भगवान जगताप, शेषेराव नंद,विश्वनाथ डबडे,भीमराव गोटे, विकास धापसे, अविनाश मालसमींदर,दिलीप मालसमींदर यांच्यासह अन्य नागरिकांची उपस्थिती होते.