दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
====================
निलंगा: क्रांतीसूर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्त शहरांत सावता माळी चौकात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा चे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते लिंबनप्पा महारज रेशमे,तर प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. चे सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, माजी नगराध्यक्षा सुनीताताई चोपणे,माजी नगराध्यक्ष हमीद शेख,कांग्रेस नेते दयानंद चोपणे, रोहित बनसोडे, रजनीकांत कांबळे,माजी सभापती विष्णू ढेरे,माजी सभापती शरद पेठकर, शिवसेनेचे दत्ता मोहळकर छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष दास साळुंके,यांच्या सह सर्व पक्षांतील नेते, व माळी समाज यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते…
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी आपला संपूर्ण आयुष्य समाजासाठी दिले. त्या काळात त्यांनी केलेल्या कार्य हे आजच्या युवा पिढीसाठी आदर्श आणि प्रेणा देणारी आहे. शिक्षण हे प्रत्येक समाजातील व्यक्तींनी घेणे गरजेचे आहे. महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकवून युवा पिढीनी त्यांच्या जीवनात त्यांनी केलेल्या समाजासाठी त्याग,चळवळ, संघर्ष,शिक्षणाची सोय,प्रत्येकाला स्वातंत्र्य, ह्या गोष्टीचा विचार करून त्या महापुरुषांना डोक्यावर नाचून नव्हे तर वाचून डोक्यात त्यांचे विचार बसवणे हे आजच्या काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन अरविंद पाटील निलंगेकरांनी यावेळी केले.आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत नंतर समाज बांधव त्यामुळे भारत मातेसाठी या पवित्र भूमीसाठी आणि समाजासाठी आपला संपूर्ण आयुष्य महापुरुषांनी समाज, राज्य आणि देश घडवून आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली अश्या सर्व महापुरुषांना अभिवादन करताना त्यांचे कार्य,विचार घरा घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा अरविंद पाटील निलंगेकरांनी समाज बांधवांना यावेळी केली…
सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात युवा सेनेचे जिल्हा समान्यवक दत्ता मोहळकर यांच्या वतीने उपस्थित सर्वाना निलंगा राईस आणि पाणीची सोय करण्यात आली होती तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद चोपणे तर आभार शरद पेठकर यांनी मानले…..