दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रतिवर्षीप्रमाणे युगप्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सिम्बॉल ऑफ नॉलेज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त प्रमुख व्याख्याते म्हणून प्रो.दादाराव गुंडरे बोलत होते. जगात आदर्श लोकशाही निर्माण करून संविधानाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांनी समाजाला दिशा दिली आहे. त्यांचे स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय व बंधुता या मूल्यांच्या माध्यमातून माणूस घडावा यासाठी कार्य केले. त्यांनी हे कार्य सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले प्रेरणादायी आहे. सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. सुनिल पवार उपप्राचार्य प्रो.हेमंत भगवान व प्रो.सतीश लोमटे, प्रा. पंडीत पवार तर अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरूजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी केले. अध्यक्षीय समारोपात ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर म्हणाले,”बहुजन गोरगरीब, दीन दलित आणि स्त्रियांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्न केले. तसेच महापुरुषांचे विचार आत्मसात करून आपापल्या क्षेत्रात स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करा.असा मौलिक संदेश अध्यक्षीय समारोप करताना दिला. डॉ.के.डी.जाधव, डॉ.नामानंद साठे, डॉ. आर. व्ही. ताटीपामुल , डॉ.संदीप महाजन, डॉ. विश्वजित मस्के, प्रा.अभिजित बोबडे, प्रा. प्रताप शिंदे,प्रा. मोहन जाधव, प्रा.शाहरुख शेख तसेच श्री अक्षय खंडागळे, डॉ. गणेश पाटील, प्रा. डॉ.मीनाक्षी जाधव, डॉ.पल्लवी उंदरे श्री विनोद खरात, श्री डी.डी.गावडे, श्री कमलाकर बंडगर, श्री रमेश पवार तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर शेवटीस आभार प्रदर्शन डॉ. डी. एस.साकोळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्री हनुमंत जाधव, श्री संतोष मोरे, श्री उमेश साळुंखे, श्री संदीप सूर्यवंशी, श्री चांगदेव खंदारे , श्री अर्जुन वाघमारे यांनी परिश्रम घेतले.