दैनिक चालू वार्ता भुम प्रतिनिधी –
भु म:- शहरातील न्यु इंग्लीश मेडियम स्कूल मध्ये पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.यामध्ये शालेय विविध कलागुण संमेलन प्रथम ,द्वितीय ,तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचासन्मानपत्र ,सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यामध्ये विद्यार्थिनी कु.धनश्री दादासाहेब राऊत हिचा इयत्ता पहिलीच्या वर्गातून Best class performer मधून प्रथम क्रमांक,education project प्रथम क्रमांक तर
खेळाच्या स्पर्धेत lemon spoon competition मधून तिसरा क्रमांक पटकावला. त्यामुळे तिला सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते देऊन तिचा गौरव करण्यात आला.यावेळी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल संस्थापक अध्यक्ष तथा मुख्याध्यापक कदम सर, सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग, महिला शिक्षिका, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.