दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा : – मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजाननिमित्त तमाम मुस्लिम बांधव उपवास करतात, या निमित्ताने लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या वतीने लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आमदार शिंदे यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन दिनांक 13 एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आली होते, यावेळी मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शामसुंदर शिंदे ,माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, शेकापचे जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे ,जिल्हाध्यक्ष बालाजी ईसातकर ,उपसभापती श्याम अण्णा पवार ,पत्रकार अन्वर शेख, प्रमुख उपस्थित होते. यावेळी आमदार शिंदे व आशाताई शिंदे यांचा मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांनी पवित्र रमजान निमित्त तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
एकता व शांतता हीच खरी राष्ट्रीय एकात्मता आहे .त्यामुळे सर्वांनी बंधुभावाने राहून शांतता टिकवणे तसेच सर्व धर्म आणि संस्कृती यांचा आदर करणे गरजेचे आहे. असे मत लोहा कंधार मतदारसंघाचे आ श्यामसुंदर शिंदे यांनी इप्तार पार्टीमध्ये व्यक्त केले.
यावेळी पुंडलिक पाटील बोरगावकर, सतीश कराळे, सुधाकर सातपुते ,राहुल बोरगावकर, जमीर किवळेकर, अन्वर पठाण, सिकंदर शेख, नगरसेवक करीन शेख, रहेमान घोडके, पत्रकार इमाम लदाफ, निहाल मन्सुरी, पत्रकार मूतुर्जा शेख, फारुख शेख, गफार भाई, मगदूम भाई, गिरीश डिगोळे, सचिन कुदळकर सह मुस्लिम बांधव पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.