दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:जलजीवन मिशन योजनेअंतर्गत देगलूर तालुक्यातील अनेक खेडेगावात नळ योजनेच्या कामाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी या कामाचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे तरी सुद्धा या कामाकडे उपविभागीय अभियंता राऊत यांनी नजर अंदाज करीत असल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर माहिती अशी की, देगलूर तालुक्यातील मौजे कोकलगाव येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ योजनेच्या कामाला सुरुवात झाली असून या कामाला किमान एक कोटी एक्कोनतीस लाख रुपये मंजूर झालेअसल्याचे सांगितले आहे तरीसुद्धा या कामात दिरंगाई करीत असल्याचेगावकऱ्यांच्या वतीने बोलले जात आहे. यावेळी पाईपलाईन करण्यासाठीकिमान तीन फुट खड्डा पाडून त्यात व्यवस्थितरित्या पाईप सोडून योग्य रित्या पाईपलाईन करण्याचे आदेश असताना कुठे एक फुट तर कुठे दिड फुटावर पाईप टाकण्यात आले असून हे पाईपलाईन जास्त काळ टिकणार नसल्याचे सांगितले जात आहे, तरी सुद्धा या गलिच्छ कामाचा कोणीच विचार करीत नाहीत तर गुत्तेदार व उपविभागीय अभियंत्याच्या संगनमताने या कामाला सुरुवातझाली असल्याचे सांगितले जातसद्याची परिस्थिती पाहता शासनाच्या वतीने विविध कामे हणेगाव भागात होत आहेत परंतू हे सर्व कामं बोगसरित्या करीत असतानाकोणत्याच विभागातून या कामाची दखल घेतली जात नाही. मागील पाच वर्षापूर्वी येडूर ते हणेगाव पाईपलाईन असो, कोकलगाव पाझर तलाव असो की, हणेगाव ते बिजलवाडी रस्त्याचे काम असो असे अनेक कामात भ्रष्टाचार होतोय तरीसुद्धा कोणीच या
उपविभागीय राऊत यांच्याशी फोनवर संपर्क साधून या कामाची चौकशी केली असता मी त्या कामावर चललो आहे व त्याठिकाणी गेल्यानंतर कामाची माहिती घेतोपरंतू हणेगाव परिसरातील कामात गुत्तेदार व अभियंत्याचे संगनमत असल्याचे बोलले जात आहे.