दैनिक चालू वार्ता, शहादा
प्रतिनिधी : क्रिष्णा गोणे
शहादा : शहादा येथे राष्ट्रीय अपंग विकास महा संघ महाराष्ट्र राज्य नंदूरबार जिल्ह्याच्या वतीने जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग बांधवांचा गौरवसमारंभ मुन्सिपल हायस्कूल शहादा येथे घेण्यात आला.
यावेळी प्रथम वर्ग न्यायाधिश शहादा माननीय व्ही. एम. पाथर्ड , तसेच महाराष्ट्र अपंग महा संघाचे शिवाजीराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम संपन्ना झाला.
कार्यक्रम शहादा सह ग्रामीण भागातील अपंग बांधव उपस्थित होते. यावेळी संबंधी प्रमुख अथिति यांनी अपंग बांधवांच्या शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी आम्ही कठीबध्द आहोत असे आश्वासन दिले.